वृक्षारोपण सोहळा ( Tree Plantation )
सेंट झेवियर्स बॉईज अकॅडमी शाळेमध्ये वृक्षारोपण सोहळा दिनांक २६ जून २०२५ रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांमार्फत साजरा करण्यात आला. ( ४ - १ ) ने तुळशी आणि ( ४ - २ ) ने गुलाबाच्या रोपट्याची लागवड केली.सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपले योगदान दिले. सदर समारंभाच्याप्रसंगी शिक्षिकेने आजच्या काँक्रीटच्या जगात झाडांचे महत्त्व किती आहे हे समजावून सांगितले. तसेच मुलांनी पुढेही असेच जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचे व त्यांची देखभाल करण्याचे वचन दिले.
मिस ग्रीनल रॉड्रिग्ज